Majhi Ladki Bahin : या महिलांना मिळणार नाही 4500 रुपये, यादीत तूमचे नाव पहा October 22, 2024 by akshay1137 Majhi Ladki Bahin Yojana Aditi Tatkare : लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यांतर्गत महाराष्ट्र राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटवर 4500 रुपये थेट पाठवले जातील. परंतु काही महिलांना केवळ दीड हजारच मिळणार आहेत. ते का हे आपण जाणून घेऊया. 28 जून 2024 रोजी राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना सुरू करण्यात आली, या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. राज्य सरकारने 1 जुलै 2024 पासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लाडकी वाहिनी योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी महिला ऑनलाइन आणि ऑफलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. लाडकी बहीण योजना हा महिलांसाठी सुरु करण्यात आलेला एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्यात आतापर्यंत 3000 रुपयांची रक्कम राज्यातील 2 कोटी 40 लाखांहून अधिक महिलांना हस्तांतरित करण्यात आली आहे. तर तिसरा हप्ता देखील वितरीत केला जात आहे. ज्या महिलांचे अद्यापही पैसे आलेले नाहीत त्या महिलांना राज्य सरकारने बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. डीबीटी अॅक्टिव्हेट न झाल्यामुळे 57 लाखपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्याप मिळालेला नाही. ज्या महिलांनी आपलं बँक अकाउंट आधारशी लिंक केलेलं नाही त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाहीत. यामुळे लवकर ही प्रक्रिया पूर्ण करा.